Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

चौकट....

चौकट, पत्त्त्यांमधला की स्त्रीलिंगी? दरवाजाची, खिडकीची, तसवीरीची, रुढींची, परंपरांची, कायद्याची, संस्कारांची, तुझी, माझी, आपल्या साऱ्यांची....                    चार बाजू आणि चार शिरोबिंदू यांनी बंदिस्त असलेली बहुभुजकृती, चौकोन-चौकट. मग कधी तिच्या चारही बाजू सारख्या लांबीच्या असतात तर कधी समोरासमोरील सारख्या असतात तर कधी चारही बाजू असमान असतात. पण आकार चौकोनीच.                    चौकटीत असणं काहींना रुचतं; सुरक्षित वाटतं तर काहीजण चौकट मोडून उधळून चौखूर (इथेही ४) धावत सुटतात. आता चौकट मोडावी का विस्तारावी हा कळीचा प्रश्न आहे. पण विस्तार हा नेहमी जीवनदायीच असतो नं! मग मोडण्यापेक्षा चौकट विस्तारणं नेहमीच स्वागतार्हच नाही का?                    सनातन वैदिक संस्कृती लाभलेल्या आपल्या हिंदुस्थानात आपल्या या अभ्यासू पूर्वजांनीदेखील काही चौकटी सांगितल्या आहेत. चार पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम व मोक्ष, चार आश्रम: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि...