वळण.... वळण, ज्याला हिंदीत मोड म्हणतात आणि इंग्लिशमध्ये टर्न म्हणतात. हो तेच ते शब्द अनेकदा वापरतो आपण. पण असं असूनही घाबरतो त्यांना सामोरे जाताना. वळणा वळणाने होणारा घाटातला प्रवास कोणाला सुख देतो तर कोणाला त्रास. वळण दिशा बदलतं, प्रवाह बदलतं अनेकदा योग्य मार्गावर आणून सोडतं. आपण वळणावर थोडे थांबतो, अवघडतो, किंचितसे साशंक होतो. का ? मला वाटतं त्याचं कारण असावं वळणापालिकडे बघता न येण्याची आपली मर्यादा. या वळणापालिकडे आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय हे माहीत नसल्याने सतत धाकधूक असते मनात. पण म्हणून वळणं टाळता येणार नाहीत. किंबहुना ती टाळूच नयेत असं मला वाटतं. प्रत्येक वळणावर नवीन काहीतरी शिकायला मिळतं. यश मिळतं नाहीतर अनुभवाचं गाठोडं तरी वाढतच. असं हे वळण आपल्या आयुष्यात क...