गेल्याच आठवड्यात मकरसंक्रांत होऊन गेली. आता रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकवाचे समारंभ सुरू राहतील. आपल्या संस्कृतीत समारंभांना विशेष महत्व आहे. प्रत्येक सणाला धरून समारंभ असतोच. हे सगळे समारंभ आपल्याला एकत्र आणतात, संवाद वाढवतात (काही वेळा वादही), आपुलकी माणुसकी समृद्ध करतात. संक्रांतीच्या निमित्ताने होणाऱ्या तिळगुळ आणि हळदीकुंकू समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात लुटणाऱ्या वस्तू. महाराष्ट्रात सर्वत्रच बहुदा हा सण थोड्या फार फरकाने असाच साजरा करतात. नवविवाहित स्त्रीच्या विवाहापासूनच्या पहिल्या 5 वर्षात काय वस्तू लुटाव्यात याबद्दल काही अलिखित नियम आहेत. त्यानंतर काहीही लुटावे आपल्याला हवे ते. "अहो यंदा काय देऊ सगळ्या बायकांना संक्रांतीचे वाण म्हणून?" यावर अहोंचे उत्तर, "माझा मोबाईल नंबर दे" हे असले पांचट जोक्स सोशल साईट्स वर मुबलक फिरू लागतात संक्रांत जवळ आली की. काय तर म्हणे माझा नंबर दे! किती चुकीचा संदेश जातो या जोकमधून याचा को...