Skip to main content

Posts

भूमिका

खरं तर आपण या पृथ्वीवर आलो आहोत तेच मुळी विधात्याने दिलेली भूमिका वठवायला. मी स्त्री आहे त्यामुळे मला वेगवेगळ्या रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात. तशा तर त्या पुरुषांनाही कराव्या लागतातच! पण तूर्तास आपण माझ्याबद्दलच बोलूया. तर मी आधी मुलगी झाले, मग बहीण, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, सून, वहिनी, काकू, मामी, मावशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई! अशा अजूनही किती तरी भूमिका मी वठवल्या आणि वठवत राहीनच. पण या प्रापंचिक भूमिकांवर वरचढ ठरते ती माझ्यातली शिक्षिकेची भूमिका! हातात खडू आला की मला इतर फारसं काही सुचत नाही. मुलांच्या गळी गणित उतरविण्याचा आटोकाट प्रयत्न मी या भूमिकेतून करते. नव्हे नव्हे माझे ध्येयच आहे ते! पण फक्त गणितच का? का तर तो माझा अध्यापनाचा विषय आहे म्हणून? तर तसे नाही. फक्त गणितच नाही तर जीवन मूल्येही या कॉलेजातील मुलांना देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. नुसता अभ्यासच नाही तर जगण्यातील आनंद मिळावा, कळावा म्हणून त्यांनी एखादी कला जोपासावी असंही मी मुलांच्या कानात बोलत असते. त्यावेळी मी फक्त शिक्षिकाच नसते तर त्या मुलांची आईपण असते. एकात एक भूमिका आपोआप वठवली जाते. मी जेव्...
Recent posts

अलवणातली बाई

शीर्षक वाचून दचकलात नं? काही जणं म्हणतील, "बाई is too down market ! निदान स्त्री तरी लिहायचं!" पण नाही मी योग्यच लिहिलंय, मला तिच्या बाईपणाविषयीच बोलायचं आहे.  मुळात आताच्या बऱ्याच जणांना अलवणातली बाई म्हणजे काय हेच कदाचित माहीत नसेल. तर माझ्या अल्पज्ञानाला जागून ते आधी सांगते. तर गेल्या शतकात किंबहुना काही दशकांपूर्वीपर्यंत आपल्या पुढारलेल्या(?) महाराष्ट्रात ब्राह्मण समाजात पती निधनानंतर त्याच्या विधवेला विकेशा करून (तिचे सर्व केस भादरून) एक कायम लाल रंगाची साडी नऊवारी (कदाचित थोडी मोठीही असेल) नेसायला लावत. आपलं संपूर्ण बोडकं डोकं झाकून दोन्ही खांद्यांवरून घट्ट पदर घेऊन तो कमरेला खोचून ह्या स्त्रिया वावरत असत.  तर अशी ही स्त्री सॉरी बाई जिचं वय अगदी १४ १५ पासून थेट ७० ८० पर्यंत काहीही असू शकतं ती विधवा पती नसल्याने तिच्या आधीच किंमत कमी असलेल्या बोलण्याला आता तर अजिबातच किंमत नाही अशा अवस्थेत कुटुंबाच्या आधाराने रहात असते. हिला आर्थिक स्वायत्तता नसायची त्यामुळे ती सासरी असेल तर सासरा किंवा दीर यांच्यावर आणि माहेरी लावली असेल तर बाप किंवा भाऊ यांच्यावर अवलंबून असे. तिला स्वत...

परिवर्तन

 काल सहज सुधा मूर्तींचा एक लेख वाचनात आला. 'विशीतील आदर्शवाद आणि चाळिशीतील वास्तवतावाद'!  खरंच आहे ऐन उमेदीत विशीत आपण फारच आदर्शवादी असतो. तारुण्यातील उसळणारं रक्त असेल, नुकताच लागलेला शैक्षणिक स्वातंत्र्याचा वारा असेल किंवा अनुभवांची तोकडी शिदोरी असेल ; कारण काहीही असेल पण त्या वयात आपल्या कल्पना फारच आदर्शवादी असतात हे खरं! त्याउलट चाळीशीत आपण वास्तव स्वीकारायला सुरुवात करू लागलेले असतो. शिक्षण आणि त्याचे उपयोजन यातील दरी सांधत सांधत जीव मेटाकुटीला आलेला असतो. अनुभवांचं बऱ्यापैकी मोठं आणि जड गाठोडं आता आपल्यापाशी असतं. नोकरी-धंद्यातलेच नाही तर वैयक्तिक आयुष्यातसुद्धा अनेक चढ उतार सहन करून पोळलेले आपण आदर्श सोडून हळूहळू वास्तव स्वीकारायला लागलेले असतो. आता हे स्वीकारणं काही वेळा जड जातं पण स्वीकारण्यवाचून गत्यंतर नसतं. मागे वळून पाहताना आपल्याच लक्षात येतं की आपण स्वतःविषयी फारच अवास्तव कल्पना बाळगल्या होत्या आणि कितीही काहीही केले तरी पूर्ण होणे शक्य नाही. काही जण हे वास्तव सहज स्वीकारतात तर काही जणांना फार त्रास होतो वास्तव स्वीकारताना. पण हे वास्तव स्वीकारणं म्हणजेच स...

चौकट....

चौकट, पत्त्त्यांमधला की स्त्रीलिंगी? दरवाजाची, खिडकीची, तसवीरीची, रुढींची, परंपरांची, कायद्याची, संस्कारांची, तुझी, माझी, आपल्या साऱ्यांची....                    चार बाजू आणि चार शिरोबिंदू यांनी बंदिस्त असलेली बहुभुजकृती, चौकोन-चौकट. मग कधी तिच्या चारही बाजू सारख्या लांबीच्या असतात तर कधी समोरासमोरील सारख्या असतात तर कधी चारही बाजू असमान असतात. पण आकार चौकोनीच.                    चौकटीत असणं काहींना रुचतं; सुरक्षित वाटतं तर काहीजण चौकट मोडून उधळून चौखूर (इथेही ४) धावत सुटतात. आता चौकट मोडावी का विस्तारावी हा कळीचा प्रश्न आहे. पण विस्तार हा नेहमी जीवनदायीच असतो नं! मग मोडण्यापेक्षा चौकट विस्तारणं नेहमीच स्वागतार्हच नाही का?                    सनातन वैदिक संस्कृती लाभलेल्या आपल्या हिंदुस्थानात आपल्या या अभ्यासू पूर्वजांनीदेखील काही चौकटी सांगितल्या आहेत. चार पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम व मोक्ष, चार आश्रम: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि...

गोल

गोल आणि वर्तुळ! आकारसाधर्म्य असणाऱ्या या दोन आकृत्या भौमितिक दृष्ट्या मात्र भिन्न आहेत. वर्तुळ द्विमितीय आहे तर गोल हा त्रिमितीय. केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा समुदाय दोन मितीत असला की त्याला वर्तुळ म्हणतात आणि तीन मितीत असला तर त्याला गोल म्हणतात. पण दैनंदिन जीवनात मात्र आपण या दोघांचा एकच असा उल्लेख करतो. गोल! त्याच्या पृष्ठभागावर एका बिंदूपासून सुरुवात केली आपण चालायला तर पुन्हा त्याच बिंदूला येऊन पोहोचतो. सतत त्याच त्याच मार्गावरून फिरत राहतो आपण गोलाकार वर्तुळाकार. जन्म जरा मरण आणि पुन्हा जन्म आयुष्याचं हे चक्र असंच चालू आहे अखंडित अविरत. चक्र वर्तुळाकार म्हणजे गोलच की! आपला जन्म होतो तोच मुळी आईच्या गोल अशा उदरात. तिच्या गोलाकार स्तनातून पाझरणाऱ्या अमृताचे पान करीतच आपण मोठे होतो. गोल वर्तुळ त्याचा परीघ आणि त्या परिघात येणाऱ्या अनेक गोष्टी, वस्तू आणि माणसं ही सारी आपलीच तर असतात. आपण केंद्रस्थानी राहून त्यांना एका ठराविक अंतरावर ठेवतो अगदी आपल्याही नकळत! गोल काहीवेळा तो भरीव असतो आणि काही वेळा पोकळ असतो. आपल्या डोक्यासारखा! काहीवेळा उगाचच अनेकानेक विचारांनी न...

मनाच्या काठावर...

अशा वळणावर येऊन थांबलंय आता आयुष्य जणू भासतो संपलाच आहे रस्ता पण तरीही पुढे जाण्याची ओढ... असंच नव्हतं का मागे सुद्धा वाटलेलं एका वळणावर अंधार दाटला होता सर्वत्र आणि वाटा भासल्या होत्या थिजलेल्या... उचंबळून म्हणून काही येतच नाही आताशा धुमारे न फुटती कशाला आता दुःखाला कोंब येतात आणि सुखाचा शिशिर सरेना... कितीतरी प्रसंग आणि आठवणी पानगळतीप्रमाणे गळून पडली रिते झाले मन सारे आणि बुद्धीही आता थकली.. हळूच कधीतरी डोकावते सोनेरी किरण सुखाचे चांदण्या कैक लुकलूकतात आणि हलकेच चांदणे पाखर घालते... वाटे कधी मिळावी पुन्हा साथ अशीच जीवाला पण आताशा त्या वाटण्यातही जोर नाही उरला.. कळतच नाही कोण करतंय ही मागणी? मी? माझं शरीर? की मन माझं? गुंत्यात या साऱ्या अडकून पडलेल्या जीवाला काहीच उमजत नाही... वाटते मौज मनाला, बंधन झुगारून देण्यात आणि मिळवण्यात आनंद उपभोगाचा कारण आताशा जबाबदाऱ्यांचं ओझं खांद्याना पेलेनासं झालय जणू... आजही खुणावतात तीच ती प्रलोभने, वेडावायची जशी पूर्वी अगदी तशीच. पण आता मात्र त्यांचं वेड लागत नाही ,उलट सावधपणे खेळ खेळला जातोय त्यांच्यासोबत अगदी नकळत पणे... ...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...