Skip to main content

Posts

Showing posts from December, 2019

मनाच्या काठावर...

अशा वळणावर येऊन थांबलंय आता आयुष्य जणू भासतो संपलाच आहे रस्ता पण तरीही पुढे जाण्याची ओढ... असंच नव्हतं का मागे सुद्धा वाटलेलं एका वळणावर अंधार दाटला होता सर्वत्र आणि वाटा भासल्या होत्या थिजलेल्या... उचंबळून म्हणून काही येतच नाही आताशा धुमारे न फुटती कशाला आता दुःखाला कोंब येतात आणि सुखाचा शिशिर सरेना... कितीतरी प्रसंग आणि आठवणी पानगळतीप्रमाणे गळून पडली रिते झाले मन सारे आणि बुद्धीही आता थकली.. हळूच कधीतरी डोकावते सोनेरी किरण सुखाचे चांदण्या कैक लुकलूकतात आणि हलकेच चांदणे पाखर घालते... वाटे कधी मिळावी पुन्हा साथ अशीच जीवाला पण आताशा त्या वाटण्यातही जोर नाही उरला.. कळतच नाही कोण करतंय ही मागणी? मी? माझं शरीर? की मन माझं? गुंत्यात या साऱ्या अडकून पडलेल्या जीवाला काहीच उमजत नाही... वाटते मौज मनाला, बंधन झुगारून देण्यात आणि मिळवण्यात आनंद उपभोगाचा कारण आताशा जबाबदाऱ्यांचं ओझं खांद्याना पेलेनासं झालय जणू... आजही खुणावतात तीच ती प्रलोभने, वेडावायची जशी पूर्वी अगदी तशीच. पण आता मात्र त्यांचं वेड लागत नाही ,उलट सावधपणे खेळ खेळला जातोय त्यांच्यासोबत अगदी नकळत पणे... ...

आपल्याला भेटलेली माणसं....

आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात. प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत. ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात. काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आ...