कृष्ण-सुदामा भेट....
सांदीपनी मुनींच्या आश्रमात भेटलेले हे दोन जीव. एक राजपुत्र तर एक गरीब ब्राह्मण. खरं पाहता त्याच्यात मैत्री व्हावी असं काही साम्य नव्हतंच. पण मनाच्या गाठी पडल्या की मैत्री होतेच.
अतिशय साधा सरळ गरीब स्वभावाचा सुदामा आणि लाघवी मनकवडा असा श्रीकृष्ण. लोभस मैत्री आणि याचे साक्षीदार उद्धव आणि बलराम. चौघे असायचे एकत्र पण मने जुळली ती कृष्ण सुदामाची.
जगराहाटीप्रमाणे शिक्षण संपले आणि सारे पांगले. अनेक वर्षे गेली मध्ये. दरम्यान राम, कृष्ण मथुरा सोडून द्वारकेला आले. सगळ्यांचे संसार बहरले राज्य सुरळीत चालू होतेच. जगभर डंका होता द्वाराकेचा.
पण या सगळ्या काळात काही सुदामा कृष्ण भेटल्याची नोंद नाही. म्हणजे द्वारकेला आल्यावरही खूप वर्षांनी ते दोघे भेटले असावेत. यातून काय कळतंय म्हणजे मला हा ते सांगते.
सुदामा पहिल्यापासूनच परिस्थितीने गरीब. त्यात मग लग्न संसार मुले बाळे यात गुंतला. आपल्यापरीने गाडा ओढत होता किंवा प्रयत्न करत होता. तेव्हाही त्याला ठाऊक होतंच की आपला मित्र कृष्ण राजा आहे. खूप श्रीमंत आहे. तो आपल्याला सहज मदत करेल. पण म्हणून काय तो लगेच नाही गेला कृष्णाकडे. स्वतःचे प्रयत्न त्याने सुरूच ठेवले.
या उलट कृष्णाचं पाहुयात. तो तर काय साक्षात भगवंतच. त्रैलोक्यात काय घडतंय हे एका ठिकाणी राहून पण ओळखणारा. त्याला ककाय कळलं नसेल आपलं मित्र सुदामा अडचणीत आहे ते? मनात आणलं असतं तर क्षणात त्याने सुदाम्याच्या परिस्थितीचा कायापालट केला असता पण त्याने तसं नाही केलं.
अनेक वर्षांनी मग पुढे कधीतरी सुदम्याच्या पत्नीने त्याला त्याच्या राजा मित्राकडे मदत मागायला पिटाळले. रिकाम्या हाती कसे जायचे म्हणून पोह्यांची पुरचुंडी सोबत दिली. तिची अपेक्षा होती की आपल्या पतीचा मित्र राजा आहे तर तो आपली मदत करेल. आणि सुदामा निघाला कृष्णभेटीला.
द्वारकेत आला सुदामा. मित्राला भेटला. त्याच्या प्रेमाने भरून पावला. अगत्याने सुखावला. पण त्याचा धीर होईना मित्राकडे मदतीचा शब्द टाकायला. खरं तर कृष्णाला सगळं कळलं होतच की. वहिनीने दिलेलं पोहे स्वीकारून आनंदाने खाऊन मन भरून आलं भगवंताचं. त्याने सुदाम्याला न मागताच सारं काही दिलं. प्रेमाने त्याची(सुदाम्याची) झोळी काठोकाठ भरली.
तर मंडळी ही तुम्हाला माहीत असलेली कथा सांगून मला काय साधायचं आहे? ते म्हणजे या मैत्रीतलं मला जाणावलेलं अध्यात्म. पहा हा सुदामा तडक नाही गेला भगवंताकडे. प्रयत्न करीत राहिला आणि शेवटी पत्नीने आग्रह केला तेव्हा गेला. म्हणजे भगवंताच्या वाटेवर जाण्यासाठी प्रेरकाची गरज असते. प्रयत्न आहेतच पण सर्वसाक्षी भगवंतांचे अधिष्ठानही हवेच. यात सुदाम्याचा भगवंतावर विश्वास नाहीये असं नाही पण तो जरा मागे पडतोय एवढंच. तसच श्रीकृष्णाचे. त्याने स्वतःहून नाही सुदाम्याला मदत केली सुदामा त्याला शरण आला तोंडाने नाहीं पण डोळ्याने कदाचित बोलला आणि मगच भगवंताची त्यावर कृपा झाली. म्हणजे आपण जे म्हणतो ना देवाला सगळं दिसत तो करेल सर्वकाही ठीक तर ते तसं नसावं. देवाला शरण गेलं पाहिजे म्हणजे तो नक्की सर्वकाही ठीक करेल.....
बोला गोपालकृष्ण महाराज की जय !!!
©उमा जोशी.
PC: राही टिकम करंजे.

खरंच आहे ते.
ReplyDeleteधन्यवाद लीनता
Delete