पाऊस येताना.......
आज सकाळी उठल्यापासूनच तिचं बिनसलं होतं. जीवाची नुसती घालमेल होत होती. काय होतंय हे मात्र काही तिच्या लक्षात येत नव्हतं. रोजच्या सवयीने सगळी कामं आटोपली जात होती. त्यात काहीच कसूर नव्हती की गडबड सांडलवंड नाही. सगळं कसा अगदी आखून नीट असंच. पण मन मात्र उद्विग्न.
काय काय सुरू होतं मनात काहीच नीटसं कळत नव्हतं. का आज असं आपलं मन बंद पुकारतेय हे पण काही कळेना. भांडण झालं नाही की रुसवा , अबोला काहीच नाही या गेल्या काही दिवसात. तरीही ही जीवाची तगमग का होतेय हेच कळत नव्हतं आणि त्याचा च जास्त त्रास होत होता.
एकीकडे जीवाला ही अशी आच लागलेली आणि दुसरीकडे बाहेरही नुसतं गरम गरम. काहिली झालेली नुसती जीवाची. इतकं सगळं उष्ण झालेलं की चालताना ठाई ठाई मृगजळ दिसत होतं. उष्म वात आणि किरणांचे अपवर्तन यांमुळे सुरू होता हा मृगजळाचा खेळ! सृष्टी आणि मन यांचा एक गुप्त करारच झालाय जणू! ही भौतिक मृगजळे जणू मनाच्या मृगजळाला आव्हानच देत होती. अशी काही विचित्र दोलायमान अवस्था आणि त्यात हा चिकचिक करणारा घाम.
तशातच ऑफिसची कामंसुद्धा अगदी रोबोटप्रमाणे बिनचूक सुरू होती. मनातली आंदोलनंदेखील वाढत होती. काय काय आणि कसलं कसलं म्हणून लक्षात राहिलेलं परत परत उसळून वर येत होतं आणि परत बसत होतं. तशातच आज सखी पण नाही. कोणाला आणि काय बोलू? इथे तिचं तिलाच कळत नव्हतं काय सुरु आहे ते?
संध्याकाळ झाली तशी अनामिक अशी हुरहूर वाटायला लागली. आता उष्मा पण वाढला आणि हवेत दमटपणा पण. अंधारून यायला सुरुवात झाली तशी ती अजूनच बेचैन होऊ लागली. कशीबशी घरी पोहोचली. चहाचं आधण ठेवलं. कितीतरी वेळा चेहऱ्यावर पाणी मारलं पण छे तगमग काही कमी होईना.
तो आला. चहाच्या निमित्ताने दोघे समोरासमोर बसली. गॅलरीत खुर्च्या टाकून. लांबवर नजर शून्यात नजर लावून काय पहात होती ती? त्याने काहीच विचारलं नाही. फक्त आपला आश्वासक हात तिच्या हातावर ठेवून नजरेनेच पुसलं तिला,"काय गं?" अन अचानक गार झुळूक आली, मेघ दाटले आणि कुंद वातावरणातच पाऊस आला....
©उमा जोशी

मनस्थितीचे वर्णन सुंदर केलयस.
ReplyDeleteThanks ga
Deleteआवडलं..
Deleteधन्यवाद 🙏
Delete