केवढा गहन विषय! बरेचदा आपण अनेकांना बोलताना ऐकतो, " मानला तर देव नाहीतर दगड" किंवा " ह्या देवबिव काही नाही , सगळं काही आपल्यावर अवलंबून आहे" वगैरे ....
पण आज मी देवावर बोलणारे(लिहिणारे). देव आहे की नाही? तो दिसतो की नाही? यापेक्षा मला वाटतं की तो आहे ही धारणाच खूप काही करून जाते.
अनेकांचं मला माहित नाही पण माझ्या बाबतीत तरी हे 100% खरं आहे. अनेक प्रसंगात "देव आहे" , " त्याच्यावर सोडून देऊयात" ," तो सगळं ठीक करेल " इत्यादी विधाने मानवी मनाला रिलॅक्स करतात.
निर्गुणाची कल्पना जनसामान्यांना येणं कठीण म्हणूनच सगुण अवतारातील देव! आणि पहा ना आपल्यासारखाच हात पाय डोळे असणारा, आवडी निवडी असणारा, रागावणारा, प्रसन्न होणारा असा देव आपल्यातीलच एक असा नाही का वाटत? उगाचच आपलं ' supernatural power' वगैरे म्हटलं की कसं 'detached' झाल्यासारखं वाटतं.... याउलट देव! असं नुसतं म्हटलं तरी कसं 'अहाहा' असं वाटतं( म्हणजे निदान मला तरी. इतरांचं माहीत नाही)
तसं बघायला गेलं तर मी काही फार कर्मकांड करणारी स्त्री नाही. विशेष म्हणजे मी एकही उपवास करत नाही. पण हो माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे. नक्कीच आहे. तोच आहे जो आपल्याला कार्य करण्याची प्रेरणा देतो, रक्षण करतो, ज्ञान देतो, वाट दाखवतो वगैरे वगैरे....
पण खरंच देव हा शब्दच खूप आश्वासक वाटतो मला. तो शब्द, त्यातला भाव, त्याची पार्श्वभूमी, पूर्वपीठिका या सगळ्यांपेक्षाही 'तो' आहे; हे असणचं खूप जास्त महत्वाचं आणि म्हणूनच जीवनव्याप्त आहे.
© उमा जोशी
10 एप्रिल 2018

Super .देवा वरती श्रद्धा प्रत्येकाची असते पण व्यक्त करायची पद्धत वेगळी
ReplyDeleteकाही जाणं म्हणतात मूर्ती पूजे वरती आमचा विश्वास नाही पण संत किंवा तत्सम व्यक्ती ज्यांना आपल्या सारखे जन सामान्य देव असा म्हणतात त्यांच्या तसबिरी ला हार घालतात हे । फक्त त्यांच्या म्हणण्या नुसार ते त्या अदृश्य शक्ती च्या दृश्य रुपाला हार घालतात। ह्या प्रमाणे देवाची मूर्ती म्हणजे त्या अदृश्य शक्ती चा दृश्य रूप नाही का?
हो न तसंच काहीसं मला म्हणायचं...
Delete