Skip to main content

देव....

केवढा गहन विषय! बरेचदा आपण अनेकांना बोलताना ऐकतो, " मानला तर देव नाहीतर दगड" किंवा " ह्या देवबिव काही नाही , सगळं काही आपल्यावर अवलंबून आहे" वगैरे ....
                  ‎पण आज मी देवावर बोलणारे(लिहिणारे). देव आहे की नाही? तो दिसतो की नाही? यापेक्षा मला वाटतं की तो आहे ही धारणाच खूप काही करून जाते.
                  ‎अनेकांचं मला माहित नाही पण माझ्या बाबतीत तरी हे 100% खरं आहे. अनेक प्रसंगात "देव आहे" ,  " त्याच्यावर सोडून देऊयात" ," तो सगळं ठीक करेल " इत्यादी विधाने मानवी मनाला रिलॅक्स करतात.
                  ‎निर्गुणाची कल्पना जनसामान्यांना येणं कठीण म्हणूनच सगुण अवतारातील देव! आणि पहा ना आपल्यासारखाच हात पाय डोळे असणारा, आवडी निवडी असणारा, रागावणारा, प्रसन्न होणारा असा देव आपल्यातीलच एक असा नाही का वाटत?  उगाचच आपलं ' supernatural power'  वगैरे म्हटलं की कसं 'detached' झाल्यासारखं वाटतं.... याउलट देव! असं नुसतं म्हटलं तरी कसं 'अहाहा' असं वाटतं( म्हणजे निदान मला तरी. इतरांचं माहीत नाही)
                  ‎तसं बघायला गेलं तर मी काही फार कर्मकांड करणारी स्त्री नाही. विशेष म्हणजे मी एकही उपवास करत नाही. पण हो माझी परमेश्वरावर श्रद्धा आहे. नक्कीच आहे. तोच आहे जो आपल्याला कार्य करण्याची प्रेरणा देतो, रक्षण करतो, ज्ञान देतो, वाट दाखवतो वगैरे वगैरे....
                  ‎पण खरंच देव हा शब्दच खूप आश्वासक वाटतो मला. तो शब्द, त्यातला भाव, त्याची पार्श्वभूमी, पूर्वपीठिका या सगळ्यांपेक्षाही 'तो' आहे; हे असणचं खूप जास्त महत्वाचं आणि म्हणूनच जीवनव्याप्त आहे.
                 © ‎उमा जोशी
                  ‎10 एप्रिल 2018


Comments

  1. Super .देवा वरती श्रद्धा प्रत्येकाची असते पण व्यक्त करायची पद्धत वेगळी
    काही जाणं म्हणतात मूर्ती पूजे वरती आमचा विश्वास नाही पण संत किंवा तत्सम व्यक्ती ज्यांना आपल्या सारखे जन सामान्य देव असा म्हणतात त्यांच्या तसबिरी ला हार घालतात हे । फक्त त्यांच्या म्हणण्या नुसार ते त्या अदृश्य शक्ती च्या दृश्य रुपाला हार घालतात। ह्या प्रमाणे देवाची मूर्ती म्हणजे त्या अदृश्य शक्ती चा दृश्य रूप नाही का?

    ReplyDelete
    Replies
    1. हो न तसंच काहीसं मला म्हणायचं...

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

              प्राजक्त......                  प्राजक्त किंवा पारिजातक एक स्वर्गीय फूल. हिंदू पुराणानुसार समुद्रमंथनातून मिळालेल्या १४ रत्नांपैकी एक.  लहानसा केशरी देठ आणि स्वच्छ शुभ्र पाकळ्यांचं हे नाजूक फूल आत्यंतिक सुवासिक असतं. केशरी देखाच्या काही छटा या शुभ्र पाकळ्यांवर पण उमटतात कधी कधी. अत्यंत सुरेख सुगंध, मन प्रसन्न करणारा.                 माझ्या बालपणी मुंबईत आमच्या सोसायटीमध्ये एक प्राजक्ताचं झाड होतं. आम्ही बऱ्याच जणी त्याची फुलं वेचायचो. आपल्याला अधिक मिळावीत म्हणून दुसरीला चुकवून लवकर जाणे वगैरे उद्योगही केले. लग्नानंतर सासरी आले. माझं सासर कोकणात त्यामुळे घर; त्याच्या पुढेमागे अंगण सगळं कसं अगदी साग्रसंगीत. घरात प्रवेश करतानाच वाटेवर हा पारिजातक उभा आणि पायाशी प्राजक्तसडा.. त्याक्षणी अगदी राणीच आहोत आपण असं वाटलं..                 तर असा हा मनाला भुरळ घालणारा पारिजातक. त्याने भामेलाही भुरळ घातली आणि कृष्ण...

घडी....

"अगं नीट घाल न घडी. लक्ष कुठे आहे तुझं? तो बघ मधला शेव सुटलाय ", आईच्या बोलण्याने भानावर आलेल्या तिने हातातल्या पैठणीकडे पाहिलं. खरंच की मधला शेव सुटलाय. "असंच होतं माझ्यासोबत", तिने मनाशीच विचार केला. कसलीही घडी घालताना बसवताना मधला शेव सुटतोच आणि बिनसतं सारं. खरच अशी सुरेख काठावर काठ आलेली घडी बघितली की मन कसं तृप्त होतं. अनेक घड्या पडलेलं आयुष्य उलगडत तिच्याशी बोलणारी तिची आई तिला कळकळीने सांगत होती जेणेकरून तिची उस्कटलेली घडी परत नीट बसावी. घडी पांघरुणाची, साडीची, कपड्यांची आणि कशाकशाची. नीट सारी टोकं जुळली की सुरेख मेळ जमतो आणि परफेक्ट घडी बसते. दुपट्याच्या घडीपासून झालेली सुरुवात मासिक पाळीच्या घडीपाशी आली आणि तिचं आयुष्य वेगळ्या वळणावर वाहू लागलं. अनेक बंधनं आली आणि घड्या पडल्या मनाला. घड्या घालून बंद केले कप्पे आणि हाताची घडी करून वाट चालू लागली. अशाच अनेक घड्या घालत घालत साडीने तिच्या आयुष्यात पायघड्या घातल्या. साडी नेसतो तेव्हा तिलाही अनेक घड्या घालाव्या लागतातच फक्त त्यांना प्रेमाने आपण ' निऱ्या ' म्हणतो. तर अशा ह्या सुरेख निऱ्या तिला सोबत ...

माझा एकदाचा ट्रेक....

माझा मित्र श्री. श्रीवल्लभ साठे याने नोकरी सोडायचा निर्णय घेऊन स्वतंत्र व्यवसाय करायचा ठरवलं तेव्हा मला जरा धक्काच बसला होता. पण काल त्याच्यासोबत ट्रेकला गेले आणि मला त्याचा निर्णय पटला. किती मनापासून जीव ओतून तो ते सर्व काम यथासांग पार पाडतो! तेसुद्धा फक्त उरकायचं किंवा ते उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणून टाकणं टाकल्यासारखं नाही तर खूप मन लावून!!!                        वल्लभने आतापर्यंत स्वतंत्र असे 17 ट्रेक्स अरेंज केले. मी या तळगड च्या ट्रेक ला त्याच्यासोबत गेले ती पहिल्यांदाच. यापूर्वी ऑगस्टमध्ये जाणार होते पण पावसाच्या(अव) कृपेमुळे नाही जाता आलं. यावेळी त्याने जवळजवळ मला ओढुनच नेलं म्हटलं तरी चालेल. " उमा, हा ट्रेक तुला नक्की जमेल. येच तू." इति वल्लभ. सो आमची स्वारी निघाली. सोबत कमीतकमी सामान आणि चालायला , चढायला त्रास होणार नाही असा पेहराव आणि महत्वाचं म्हणजे त्यानिमित्ताने घेतलेले शूज घातले आणि ध्यान निघालं पहाटे 5 ला.                        मयुरेश पंडित माझा स...