Skip to main content
विश्वबंधुत्वाच्या दिशेने एक पाऊल...

                मित्रांनो आज ११ सप्टेंबर. हा दिनांक आणि अमेरिका यांचं एक पक्के नातं आहे. दोन वेगवेगळ्या कारणांनी या दिवशी पूर्ण अमेरिकाच काय पण सारं जगच हादरलं होतं. फक्त एक धक्का सुखद होता तर दुसरा दुःखद. एकाने सर्वांना एकत्र येण्यासाठी साद घातली तर दुसऱ्याने दहशत पसरवली. एकाने सर्वांना प्रेमाने ज्ञानाने आपलेसे केले तर दुसऱ्याने मात्र सगळ्यांना सळो की पळो करून सोडले.
                 अगदी अचूक ओळखलंत सगळ्यांनी. ११ सप्टेंबर २००१ या रोजी ओसामा बिन लादेनच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेने अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्राशी निगडित अशा पेंटागॉन तसच वर्ल्ड ट्रेड सेंटर या इमारतींवर विमाने वापरून हल्ला केला. अपरिमित वित्त व जीवित हानी झाली आणि साध्य काय झालं तर काहीच नाही. स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याचा हव्यासापोटी निरपराध जीवांचे बळी मात्र गेले.
         आणि याच्या अगदी उलट घडलेलं ११ सप्टेंबर १८९३ ला. जागतिक सर्वधर्म सभेत पौर्वात्याचा ज्ञानसूर्य अमेरिकेच्या आकाशात तळपला असा की त्याने सर्वांना प्रेमाची ज्ञानाची तपश्चर्येची आपलेपणाची ऊब दिली. परदेशातील सर्व जनांना आपले बंधू आणि भगिनी म्हणून संबोधलं आणि त्यांच्यासोबत प्रेमाचं नात जोडलं. पश्चिमात्यांच्या मनांत हिंदू धर्म हिंदू भूमी विषयी असणाऱ्या खुळ्या कल्पना दूर करून सत्याचा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहचवला. अभिमानाने आणि ताठ मानेने आपल्या धर्माची तत्वे सादर केली आणि साऱ्या जगाला आपलेसे केले ते स्वामी विवेकानंदांनी!
          मला वैयक्तिक कोणालाच कोणत्याच धर्माला दोष द्यायचा नाही. पण मी हिंदू धर्मात जन्म घेतला हे मी माझे सौभाग्य समजते. माझा धर्म कोणावरही अन्याय, अत्याचार करायची मला सूचना देत नाही की परवानगी ही देत नाही. सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना निरामय आरोग्य लाभो असं शिकवणार माझा हिंदू धर्म, ज्याची विजयपताका त्रिखंडात मिरवणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा मला सार्थ आदर वाटतो. त्या महान तपासव्याने जे काही केले, सांगितले त्याचे आकलन होणे आणि त्याच्याच पाऊलवाटेने चालणे हे योग्यच वाटू लागते.
        आजच्या या दिनी या दोन्ही प्रसंगाचे स्मरण होते आणि मग आपण स्वतःलाच प्रश्न करतो मी काय व्हावं? कशाप्रकारे साऱ्या जगाला कवेत घ्यावं? निश्चितच प्रेमाने! दहशतीचे नाहीच नाही! स्वामीजींनी आपल्या धर्माला मिळवून दिलेल्या मानसन्मानाला कोठेही कमीपणा येणार नाही, झाली तर त्यात वृद्धीच होईल असा निर्धार करून आजच्या या विश्वबंधुत्व दिनानिमित्त एक पाऊल पुढे टाकू! या सारे मिळून या विश्वाला आपलेसे करूया!

©उमा जोशी ११/०९/२०१९

PC: Google.
         

Comments

  1. खूप छान लिहितेस उमा.
    स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल कॉलेज ला असताना वाचलं होतं. त्यांचे कार्य, विचार याने मन भारून गेले.

    ReplyDelete
  2. खुप छान विचार मांडले आहेस.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

              प्राजक्त......                  प्राजक्त किंवा पारिजातक एक स्वर्गीय फूल. हिंदू पुराणानुसार समुद्रमंथनातून मिळालेल्या १४ रत्नांपैकी एक.  लहानसा केशरी देठ आणि स्वच्छ शुभ्र पाकळ्यांचं हे नाजूक फूल आत्यंतिक सुवासिक असतं. केशरी देखाच्या काही छटा या शुभ्र पाकळ्यांवर पण उमटतात कधी कधी. अत्यंत सुरेख सुगंध, मन प्रसन्न करणारा.                 माझ्या बालपणी मुंबईत आमच्या सोसायटीमध्ये एक प्राजक्ताचं झाड होतं. आम्ही बऱ्याच जणी त्याची फुलं वेचायचो. आपल्याला अधिक मिळावीत म्हणून दुसरीला चुकवून लवकर जाणे वगैरे उद्योगही केले. लग्नानंतर सासरी आले. माझं सासर कोकणात त्यामुळे घर; त्याच्या पुढेमागे अंगण सगळं कसं अगदी साग्रसंगीत. घरात प्रवेश करतानाच वाटेवर हा पारिजातक उभा आणि पायाशी प्राजक्तसडा.. त्याक्षणी अगदी राणीच आहोत आपण असं वाटलं..                 तर असा हा मनाला भुरळ घालणारा पारिजातक. त्याने भामेलाही भुरळ घातली आणि कृष्ण...

घडी....

"अगं नीट घाल न घडी. लक्ष कुठे आहे तुझं? तो बघ मधला शेव सुटलाय ", आईच्या बोलण्याने भानावर आलेल्या तिने हातातल्या पैठणीकडे पाहिलं. खरंच की मधला शेव सुटलाय. "असंच होतं माझ्यासोबत", तिने मनाशीच विचार केला. कसलीही घडी घालताना बसवताना मधला शेव सुटतोच आणि बिनसतं सारं. खरच अशी सुरेख काठावर काठ आलेली घडी बघितली की मन कसं तृप्त होतं. अनेक घड्या पडलेलं आयुष्य उलगडत तिच्याशी बोलणारी तिची आई तिला कळकळीने सांगत होती जेणेकरून तिची उस्कटलेली घडी परत नीट बसावी. घडी पांघरुणाची, साडीची, कपड्यांची आणि कशाकशाची. नीट सारी टोकं जुळली की सुरेख मेळ जमतो आणि परफेक्ट घडी बसते. दुपट्याच्या घडीपासून झालेली सुरुवात मासिक पाळीच्या घडीपाशी आली आणि तिचं आयुष्य वेगळ्या वळणावर वाहू लागलं. अनेक बंधनं आली आणि घड्या पडल्या मनाला. घड्या घालून बंद केले कप्पे आणि हाताची घडी करून वाट चालू लागली. अशाच अनेक घड्या घालत घालत साडीने तिच्या आयुष्यात पायघड्या घातल्या. साडी नेसतो तेव्हा तिलाही अनेक घड्या घालाव्या लागतातच फक्त त्यांना प्रेमाने आपण ' निऱ्या ' म्हणतो. तर अशा ह्या सुरेख निऱ्या तिला सोबत ...

माझा एकदाचा ट्रेक....

माझा मित्र श्री. श्रीवल्लभ साठे याने नोकरी सोडायचा निर्णय घेऊन स्वतंत्र व्यवसाय करायचा ठरवलं तेव्हा मला जरा धक्काच बसला होता. पण काल त्याच्यासोबत ट्रेकला गेले आणि मला त्याचा निर्णय पटला. किती मनापासून जीव ओतून तो ते सर्व काम यथासांग पार पाडतो! तेसुद्धा फक्त उरकायचं किंवा ते उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणून टाकणं टाकल्यासारखं नाही तर खूप मन लावून!!!                        वल्लभने आतापर्यंत स्वतंत्र असे 17 ट्रेक्स अरेंज केले. मी या तळगड च्या ट्रेक ला त्याच्यासोबत गेले ती पहिल्यांदाच. यापूर्वी ऑगस्टमध्ये जाणार होते पण पावसाच्या(अव) कृपेमुळे नाही जाता आलं. यावेळी त्याने जवळजवळ मला ओढुनच नेलं म्हटलं तरी चालेल. " उमा, हा ट्रेक तुला नक्की जमेल. येच तू." इति वल्लभ. सो आमची स्वारी निघाली. सोबत कमीतकमी सामान आणि चालायला , चढायला त्रास होणार नाही असा पेहराव आणि महत्वाचं म्हणजे त्यानिमित्ताने घेतलेले शूज घातले आणि ध्यान निघालं पहाटे 5 ला.                        मयुरेश पंडित माझा स...